Share

एमपीएससीची तयारी; औरंगाबादेत ‘या’ महाविद्यालयात होणार परिक्षा!

Published On: 

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने येत्या शनिवारी (दि.४) आणि रविवारी (दि.५) विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. अशी माहिती एमपीएससी परीक्षा विभागाच्या वतीने देण्यात आली. एकूण १ हजार ८६८ विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी मौलाना आझाद कॉलेज, एमजीएम इंजिनिअरिंग कॉलेज, वेणूताई चव्हाण शाळा, बळीराम पाटील शाळा, मिलिंद कला महाविद्यालयासह आदी एकूण सहा परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

शनिवारी घेण्यात येणारी एमपीएससी विभागाची दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही सकाळी ११ ते १२ या वेळेत घेण्यात येणार आहे. सदरील परीक्षेला एकूण १९ हजार ६७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एकूण ६० केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेसाठी एकूण १ हजार ९८० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सर्व नियमांचे पालन करूनच विद्यार्थ्यांना परिक्षेला बसू दिले जाणार आहे.

परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी वेळेवर हजर राहणे अनिवार्य आहे. याशिवाय सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना मास्क लावूनच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोव्हीडचे सर्व नियम पाळावे असेही परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी (दि.५ ) भविष्य कर्मचारी निधी संघटन परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सकाळी १० ते १२ या वेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण २८० कर्मचारी नियुक्त केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!