🕒 1 min read
औरंगाबाद : सोयगाव वनपरिक्षेत्राच्या कोऱ्हाळा येथील राखीव वनात तीन रानडुकरांची अवैध शिकार केलेल्या सिल्लोड तालुक्यातील सात जणांना सोयगाव वनपरिक्षेत्रातील पथकाने रंगेहात पकडल्याची घटना उघडकीस आली होती. सोयगाव तालुक्यातील देव्हारी शिवारातील खवले मांजर शिकार प्रकरणानंतर सोयगाव वनविभागाने वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या दुसऱ्या प्रकरणाचा सापळा रचून छडा लावला आहे. यात आरोपींचा जामीन नामंजूर करण्यात आला आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, सोयगाव वनक्षेत्रातील मौजे कोऱ्हाळा बीट मधील राखीव वन खंड ५६८ मध्ये काही इसमानी रानडुकरांची शिकार केल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. माहिती मिळताच उपवसंरक्षक एस व्हीं मंकावार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या नेतृत्वात वन कर्मचाऱ्यांनी हिम्मत साळवे (३५), देवचंद पवार (३८), साहेबराव साळवे (४२), रामराव सपकाळ (४०), सोमीनाथ चंडोल (२५) आणि रवींद्र सपकाळ (२३ रा.जामडी, ता.कन्नड) या सात जणांना घटनास्थळी शिकार केलेल्या रानडुकराचे मटन तयार करीत असताना रंगेहात पकडले. त्यांचेकडून रानडुकराचे मास, अवयव, मृत रानडुक्कर व शिकारीचे साहित्य आदी मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर पुढील तपासासाठी वनविभागाने आरोपींचा तीन दिवसांचा FCR घेतला व कसून तपास केला असता आरोपींच्या घरी शिकारीचे जाळे आढळून आले. आरोपींनी अतिशय क्रूरतेने दगडाने ठेचून रानडुकराची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी सात जणांविरुद्ध राखीव जंगलात प्रवेश करणे, आग लावणे, वृक्षांना इजा करून नुकसान करणे, शिकार करणे आदी प्रतिबंधित कृत्याबद्दल वन व वन्यजीव अधिनियम अंतर्गत विविध कलमअन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. याप्रकरणी सत्यजित गुजर वनसंरक्षक औरंगाबाद, एस.व्ही मंकावार उपवनसंरक्षक औरंगाबाद, पुष्पा पवार सहायक वनसंरक्षक सिल्लोड यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ पुढील तपास करीत आहेत.
अवैध शिकारीचा प्रयत्नही करू नये
वन व वन्यजीव यांचे संरक्षण व जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अवैध शिकाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. कोणीही शिकार किंवा शिकारीचा कोणताही प्रयत्न करू नये. नागरिकांना अशा प्रकारची माहिती मिळाल्यास नजीकच्या वनपरिक्षेत्र कार्यालयास कळवावे व वन व वन्यजीवांच्या संरक्षणात सहकार्य करावे.
– सूर्यकांत मंकावार (उपवनसंरक्षक औरंगाबाद)
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदी सरकारनेच उत्सवांवर निर्बंध घालण्याचे आदेश दिले,’ आता मोदींविरोधात भाजप आंदोलन करणार का?
- उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या टीमकडून लूटमार सुरू-किरीट सोमय्या
- विजय वडेट्टीवार दारुच्या नशेत बोलतात का ? तुषार भोसलेंचा हल्लाबोल
- ‘बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं’, जयंत पाटलांचा पडळकरांना टोला
- ‘भाजपने १०० टक्के लसीकरणासाठी शंखनाद आंदोलन करावं’; सतेज पाटलांचा खोचक सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
