🕒 1 min read
पुणे : कोरोना काळात सर्वसामान्य जनतेला वेगळे नियम आणि राजकीय नेत्यांना वेगळे नियम आहेत का असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. पुण्यातील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्यांनी मुलाच्या लग्नात कोरोना नियमांची अक्षरशः ऐशी तैशी केली आहे. दोनशे वऱ्हाडीची मुभा असताना तब्बल दोन हजार वऱ्हाडीच्या उपस्थित लग्न सोहळा पार पाडला. शिवाय वऱ्हातीला डिजेचा दणदणाट ही केला.
दरम्यान, आता देवराम लांडे यांच्यासह जुन्नर येथील मंगल कार्यालयाचे मालक तसेच व्याही अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जून्नर पोलीसांनी आपत्ती प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला. त्यापाठोपाठ संध्याकाळी केवाडी ता. जुन्नर गावामध्ये वरातीसाठी ५०० ते ७०० लोकांचा जमाव जमवुन डीजे वाजवल्याची फिर्याद पोलिस अम्मलदार गणेश बाळूजोरी यांनी दिली. त्यामुळे डीजे मालक व देवराम लांडे यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा दाखल झल्यामुळे देवराम लांडे यांच्या विरोधात २४ तासात सलग दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
तोंडाच्या वाफा फक्त जनतेसाठी आहेत काय मुख्यमंत्री महोदय???
शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मुलाच्या लग्नात दोन हजार वऱ्हाडी, करोना नियमांचा फज्जाhttps://t.co/8AQgy2HFDkhttps://t.co/Zuap0wBqlr
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 30, 2021
दरम्यान, या सर्व प्रकारावर भाजपने शरसंधान केले आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. तोंडाच्या वाफा फक्त जनतेसाठी आहेत काय मुख्यमंत्री महोदय??? शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मुलाच्या लग्नात दोन हजार वऱ्हाडी, करोना नियमांचा फज्जा … असं ट्वीट त्यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आम्ही राणेंचे नाही राज ठाकरेंचे सैनिक आहेत,’ अविनाश जाधवांचा इशारा
- पुढील ३-४ दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता
- ‘मी काय म्हणतो साहेब CBI प्रमाणेच ED लाही राज्यात तपास कराया बंदी घाला, लैच सालटवत्यात’
- ‘महाविकास आघाडीच्या बेफिकिरीमुळेच ओबीसींचे नुकसान’, खा.प्रीतम मुंडेंचा आरोप
- ‘भाजपा नेतेच कोरोनाचे कॅरिअर, जनतेने त्यांच्यापासून दूर रहावे,’ कॉंग्रेसचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
