Share

#MPSC : सरकार काय गांजा पिऊन बसलं आहे का? : गोपीचंद पडळकर

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं १४ मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले आहेत. या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

यापूर्वीही एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे आधीच निराश झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळून आली. याच रोषातून ‘एमपीएससी’च्या उमेदवारांनी पुण्यात रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा व ‘एमपीएससी’चा तीव्र निषेध व्यक्त केला.

दरम्यान, ‘मुख्यमंत्र्यांशी याविषयासंदर्भात चर्चा झाली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे कि विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. परंतु याबाबत MPSCने तारखा घोषित करत असताना महाराष्ट्र सरकारला विश्वासात घेतल नाही. ज्या व्यवस्था करायच्या त्याच्या साठी सरकारला विश्वासात घेतल नाही. असे मोठे वक्तव्य मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

यावेळी विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिक्रियेचा पडळकरांनी जोरदार समाचार घेतला आहे. माध्यमांकडून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सरकारवर जोरदार प्रहर केला आहे. ‘सरकार काय गांजा पिऊन बसाल आहे काय’ असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे.

राज्य शासनानं परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थ्यामंध्ये संतापाचं वातावरण आहे. पोलिसांकडून विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, विद्यार्थ्यांनी पोलिसांचं ऐकलं नाही. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!