परभणी : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. त्यात अनेक भागातील पंचनामे अद्याप झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत परभणीचे खासदार संजय जाधव यांनी घनसावंगी तहसील कार्यालयात जनता दरबार घेत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.
सदरील बैठकीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सर्व बँकेचे मॅनेजर उपस्थित होते. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, पीककर्जात येणाऱ्या अडचणी, पिकविम्यासंदर्भातील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न या बैठकीमध्ये करण्यात आला. तसेच अशा अडचणी सोडवण्याच्या सूचना खासदार संजय जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
परभणी आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये या वर्षी अतिवृष्टी झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यात पंचनामे न झाल्याने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राजकीय मंडळी आणि प्रशासन जागे झाले आहेत. शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही’
- खंडणीखोर देखील यांची कृती पाहून आत्महत्या करतील – सुधीर मुनगंटीवार
- ‘पवारांवर जनताच नाराज; त्यामुळे उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार नाही’
- ‘२०२४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापूर्ती पण राहणार नाही’
- ‘..आता कोथळा काढायची भाषा केली जाते!’, शरद पवारांचे महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

