नागपूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुढील काही दिवसांत आणखी वाढण्याची वैद्यकीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शहराच्या व जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीच्या परिस्थितीत सर्वोच्च आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे. त्यासाठी प्रशासन, पोलिस, आरोग्य, महापालिका या सर्व यंत्रणांनी नियोजनपूर्वक जबाबदारीने काम करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.
पुढील काही दिवस शहराची परिस्थिती अशीच गंभीर राहिल्यास लॉकडाऊन करण्याबाबतचा विचार करता येईल का? या संदर्भातही त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.मुंबई येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी शुक्रवारी दोन सविस्तर बैठकी घेतल्या. पहिली बैठक महानगरपालिका व पोलिस प्रशासन यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची झाली. या बैठकीमध्ये मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. व पोलिस आयुक्त अमितेशकुमार व अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये प्रामुख्याने गर्दीवर नियंत्रण करून संसर्ग पसरण्यापासून रोखण्याचे आवाहन करण्यात आले. कोरोनावर मात करण्यासाठी एस.एम.एस.(सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर) हे प्रभावी उपाय आहेत.
कोरोनाची साखळी तोडायची असेल तर किमान १४ दिवस लॉकडाऊन लावावा लागेल. मात्र, लॉकडाऊन केल्यास गोर-गरीब, निराधार, छोटे दुकानदार, फुटपाथ विक्रेते, बेरोजगार आदी घटकांचे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात. उद्योगांवरदेखील विपरीत परिणाम होईल. मात्र, परिस्थिती अशीच गंभीर राहिल्यास काही दिवस लॉकडाऊन करण्याबाबतचा विचार करता येईल का? या संदर्भातही त्यांनी यावेळी चर्चा केली.गर्दीवरील नियंत्रणाबाबत पालकमंत्र्यांनी सर्वाधिक चिंता व्यक्त केली.
अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर निघू नये. शक्यतो ऑनलाईन पद्धतीने खरेदीचे धोरण स्वीकारायला हवे. बाहेरून आपल्या घरात येणारा व्यक्ती कोरोना घेऊन येऊ शकतो. त्यामुळे सतर्क राहण्यासाठी नागरिकांची मानसिकता तयार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासाठी सर्व स्तरावरून मोठय़ा प्रमाणात प्रचार, प्रसार यंत्रणा राबविण्याबाबत त्यांनी निर्देशित केले.
पोलिसांसाठी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये बेड आरक्षित ठेवा अमितेश कुमार यांनी पोलिसांच्या सुरक्षासंदर्भातील प्रश्न यावेळी उपस्थित केल्यावर पालकमंत्र्यांनी तातडीने यासंदर्भात व्यवस्था करण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच त्यानंतरच्या बैठकीत सर्व वैद्यकीय आस्थापनांना पोलिसांसाठी बेड राखीव ठेवण्याचे त्यांनी निर्देशित केले. सोबतच पोलिसांना ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर, औषधे अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याचेदेखील त्यांनी निर्देश दिले…
महत्वाच्या बातम्या:-
- हरीयाणाची ‘ब्ल्यू व्हिस्की’ यवतमाळात पोहचली कशी, बघा अजून काय सापडले आहे
- नागपूरकरांच्या प्रेमावर तुकाराम मुंढेंनी व्यक्त केली कृतज्ञता, म्हणाले…
- आरोग्य सेवा कोडमडली असताना प्रशासन ‘जम्बो कोविड रुग्णालया’चे कागदी घोडे नाचवित आहे का?
- परीक्षा पद्धत साधी व सोपी, विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नये- प्राजक्त तनपुरे
- भाजपाच्या घरातील धुण्यांमध्ये अनेक धुणी डाग पडलेली आहेत, सचिन सावंतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

