🕒 1 min read
मुंबई : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यापूर्वी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे हे दादरच्या शिवाजी पार्कवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वांद्रे येथील बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या दोन्ही दसरा सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ एकमेकांवर धडाडणार आहे. दरम्यान खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटावर घणाघात केला आहे.
विनायक राऊत यांची शिंदे गटावर टीका-
दरम्यान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली. “पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच सोन लुटलं जायच आता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार आमच्यासाठी मौलिक आहेत. आम्ही खरे बाळासाहेबांचे निष्ठावाण हे सांगण्यासाठी शिंदे गटाकडून केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. पण आज बाळासाहेब असते तर यांच्या ढुंगणावर लाथ मारुन मिठी नदीमध्ये यांचे विसर्जण केले असते. बाळासाहेबांचे स्थान हे ह्रदयात असले पाहीजे, बाळासाहेबांचे विचार हे डोक्यात असले पाहिजे आणि बाळासाहेबांवरची श्रद्धा खऱ्या अर्थाने संपूर्ण शरीरात भिनलेली पाहीजे. त्यामुळे अशा बाजारु लोकांना बाळासाहेब कळणार नाहीत,” असे विनायक राऊत म्हणाले.
अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया-
“लाखोच्या संख्येने कार्यकर्ते बीकेसी मैदानावर येत आहेत. ऐतिहासिक गर्दी एकनाथ शिंदे यांच्या सभेला राहणार आहे. ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. तेव्हापासून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा आशिर्वाद एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे. हिंदुत्वाची भूमिका घेऊन ते सर्वांसमोर जात आहेत,” असे शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला संबोधित करतील, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर संबोधित करतील. या दोन्ही मेळाव्याकडे देशाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा ५ दशकांपासून सुरू आहे. मात्र या वर्षी दोन मेळावे होत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena | महिला शिवसैनिकांनी शिंदे गटातील कार्यकर्त्यांना भर रसत्यात चोपलं, नाशिक – मुंबई महामार्गावरील घटना
- Breaking News | मोठी बातमी! शिंदे गटाच्या मेळाव्याला जाणाऱ्या कार्यकर्त्याचा मृत्यू, कारणही समजलं
- Dasara Melava | शिंदे गटाच्या मेळाव्यापूर्वी अब्दूल सत्तार यांची प्रतिक्रिया! म्हणाले, “हिंदुत्वाची भूमिका…”
- Pankaja Munde | आता विषय संपला, तुम्ही कुणीही पदाची अपेक्षा करायची नाही – पंकजा मुंडे
- Bharat Gogawale । “आम्ही त्यांना पवारांच्या ताटाखालचे मांजर म्हणायचं का?”; गोगवलेंचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
