मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाज आक्रमक झाला असून येत्या १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.
कोल्हापुरात मराठा समाज गोलमेज परिषद पार पडली. या परिषदेत हा निर्णय घेण्यात आला आहे. मागण्या मान्य झाल्यास महाराष्ट्र बंद मागे घेऊ, परंतु समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाज १० ऑक्टोबरला रस्त्यावर येईल, असा इशारा सुरेश पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, खासदार संभाजीराजे यांनी या महारष्ट्र बंदला आपला पाठींबा नसल्याचे स्पष्ट केले आहे “माझा महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही. महाराष्ट्र बंद करून काही फायदा होईल का? कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे बंद नकोच. बंद पुकारणारे मराठा समाजातील नेते नाहीत. त्यांच्या बंदला मराठा समाजातून पाठिंबा नाही,” असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
तर दुसरीकडे ‘ओबीसी आरक्षणात आम्हाला आरक्षण नको. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण हवं आहे. ओबीसी नेते मला भेटत आहेत. आजही भेटणार आहेत. धनगर आरक्षणाला माझा पाठिंबा आहे. त्यांनी कधीही बोलवावं मी त्यांच्यासोबत आहे,’ असंही संभाजीराजेंनी नमूद केलं.
महत्वाच्या बातम्या
- अनुराग कश्यप म्हणाला मी ‘तेव्हा’ भारतात नव्हतोच; पायलने दिले सणसणीत उत्तर
- मुख्यमंत्रीपद सेनेकडं असूनही शिवसैनिकांचा हिरमोड होणार?
- उत्तर प्रदेशातील गुंडा राजमध्ये महिला सुरक्षित नाहीत- यशोमती ठाकूर
- मार्कंडेय काटजूंचे वादग्रस्त वक्तव्य; हाथरस प्रकरणाचं फोडलं बेरोजगारीवर खापर
- नगरमध्ये नव्याने कोरोना रुग्णवाढीपेक्षा डिस्चार्जची संख्या जास्त


