मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अनेक वर्षांची परंपरा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना या दसरा मेळाव्याची सुरुवात मुंबईमध्ये करण्यात आली. यानंतर शिवसेनाप्रमुख दसऱ्याचं औचित्य साधून शिवसैनिकांना संबोधित करण्याला कधीच खंड पडला नाही. यंदा मात्र खुद्द शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान असताना शिवाजी पार्कवर पार पडणाऱ्या या सोहळ्यावर कोरोनाचे सावट आहे.
राजकीय समीकरण बदललं आणि २०१९ च्या विधानसभा निकालानंतरच्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेने सत्तास्थापन केली. त्याच शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवा जोश निर्माण झाला. मात्र फेब्रुवाडीच्या मध्यानंतर कोरोनाचा शिरकाव देशात झाला आणि पुढे हा उद्रेक वाढतच गेला. त्यामुळे यावर्षी शिवतीर्थावर हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने दसरा मेळावा घेणे हे मात्र शक्य होणार नाही असं स्पष्ट असल्याने शिवसैनिकांच्या उत्साहाचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे. आजच्या सामना अग्रलेखातून दसरा मेळाव्यावर भाष्य करण्यात आलं आहे.
दसरा मेळाव्याचं काय?
लोकांनी ईद साजरी केली नाही, सार्वजनिक गणेशोत्सवात संयम राखला. गणपती कधी आले व गेले ते समजलेच नाही. इतका फिका गणेशोत्सव इतिहासात कधी साजरा झाला नव्हता, पण संकटच असे गंभीर आहे की, आनंदास मुरड घालून सण-उत्सव साजरे करावे लागले आहेत.
आता नवरात्री, दसरा, पाठोपाठ दिवाळी येत आहे. लगोलग नाताळ आणि नववर्षाचे आगमन आहेच. दसरा-दिवाळीत गर्दी तर होणारच. नवरात्रीच्या दांडियावर बंधने आलीच आहेत, पण शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे भविष्यही या क्षणी अधांतरीच आहे. लाखो लोक विचारांचे सोने लुटायला शिवतीर्थावर जमतात. महाराष्ट्रातला हा एक राजकीय, पण सांस्कृतिक उत्सवच असतो.
अनेक वादळांत हा दसरा मेळावा आजपर्यंत झालाच आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला असताना शिवसैनिकांच्या उत्साहास कसा बांध घालायचा हा प्रश्नच आहे. पण कायदा, नियमांचे पालन तर करावेच लागेल. छत्रपती शिवराय, आई जगदंबा जो मार्ग दाखवतील त्याच मार्गाने पुढे जावे लागेल. कायद्याच्या राज्याला गालबोट लागेल आणि त्यामुळे विरोधकांना टीकेचा दांडिया नाचवता येईल, असे काहीच घडणार नाही. हे सर्व ठीक असले तरी अनलॉक-5 मुळे लोकांचे जनजीवन थोडे तरी रुळावर यावे अशी अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
- मार्कंडेय काटजूंचे वादग्रस्त वक्तव्य; हाथरस प्रकरणाचं फोडलं बेरोजगारीवर खापर
- मित्रा डोनाल्ड,लवकर बरा हो….’; मोदींनी दिल्या ट्रम्प यांना शुभेच्छा
- दरेकरांच्या अडचणी वाढल्या, मुंबई बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश
- विवेक रहाडे यांच्या कुटुंबियांची नरेंद्र पाटील यांनी घेतली भेट,पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले
- महिला सशक्तीकरणासाठी भारताचे कायदे सशक्त आणि सक्षम आहेत : स्मृती इराणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

