कोल्हापूर : आजपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरातून मूक आंदोलनाची सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांची नेतृत्त्वात आज हे आंदोलन पार पडणार आहे. या आंदोलनात प्रकाश आंबेडकर, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटीलही सहभागी झाले आहेत. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी उपस्थित राहिले आहेत.
अशात नुकतीच कोरोनावर मात केलेले शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे देखील उपस्थित राहिले आहेत. नुकतीच कोरोनावर मात केली असल्याने हाताला सलाईन लावून धैर्यशील माने आंदोलन स्थळी उपस्थित राहिले आहेत.
मराठा समाजाचे दुसरे आंदोलन आज खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वात आज होत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे, कोल्हापूरच्या जनतेचा आवाज लोकसभेत उठवणे. छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जाणे. अशात उपेक्षित असलेला मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी एकवटला असताना कसल्याही परिस्थितीत समाजाच्या सोबत उभे राहणे माझी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी धैर्यशील माने यांनी दिली आहे.
तर, मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन आहे. हा मूक मोर्चा आहे. आज लोकप्रतिनिधी बोलतील, मराठा समाज दु:खी आहे. समाजाला न्याय मिळावा अशी सरकारला विनंती आहे. आमचा लोकप्रतिनिधींवर विश्वास आहे, मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांच्या आवाहनावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
- कर्नाळा सहकारी बँक घोटाळा प्रकरण नेमके आहे तरी काय ?
- इंग्लंडला नमवून डब्ल्युटीसी फानयलसाठी न्यूझीलंडचा संघ साऊथम्पटनमध्ये दाखल
- नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलोय – चंद्रकांत पाटील
- मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन – संभाजीराजे


