🕒 1 min read
वाशीम : वाशीम जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोनाची साखळी तोडण्याकरिता १५ दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक असल्यासच घराच्या बाहेर पडावे, बाहेर कोरोना विषाणूचा राक्षस आपल्याला गिळंकृत करण्याकरिता आ वासून उभा ठाकला आहे. त्यामुळे घरीच थांबून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांनी केले आहे.
रुग्णांची चिंताजनक वाढत्या संख्येमुळे वाशीम येथे आरोग्य प्रशासनाची खासदार भावना गवळी यांनी बैठक घेऊन आरोग्य प्रशासनाच्या अडचणी जाणून घेतल्या. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा जालना व अमरावती येथून करण्यात येत होता. परंतु तेथील रुग्णसंख्या वाढल्यामुळे ऑक्सिजन पुरवठा करण्याकरिता अडचणी निर्माण होत आहे. सध्यस्थितीत ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडु नये याकरिता जिल्हा प्रशासनाला बोलावून अकोला येथून पुरवठा करावा, अशा सूचना दिल्यात.
तसेच वाशीम येथे मंजूर असलेल्या ऑक्सिजन प्लँटचे काम थांबले होते. ते ॲब्सेटेम कंपनीचा ऑक्सिजन फ्लॅन्टचे काम त्वरीत सुरू व्हावे, याकरिता ऑक्सिजन कंपनीच्या व्यवस्थापनासोबत १४ एप्रिलपासून संपर्क साधून त्यांना वाशीम येथील ऑक्सिजन फ्लॅन्टला लागणारे कॉम्प्रेसर विनाविलंब त्वरीत पाठवून कोरोना रूग्णांकरिता ऑक्सिजन प्लॅन्टचे त्वरीत काम सुरू करण्याच्या सूचना दिल्यात. रेमडेसिविर इंजेक्शनचा अचानक वाढलेल्या रुग्णांमुळे तुटवडा आलेला असून इंजेक्शन उपलब्ध करण्याकरिता शासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे खासदार भावना गवळी यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ८० कोटींचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणारा भामटा गजाआड
- संजय राठोडनंतर यवतमाळचे नवे पालकमंत्री भुमरे विस्कटलेली घडी कशी बसवणार?
- ‘खबरदारी घ्या, अन्यथा परिस्थितीबाहेर जाईल’, आ.संजय राठोड यांचा इशारा
- भाजप नेत्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आ.संजय गायकवाडांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र


