Share

शिवराज्याभिषेक दिनी अमोल कोल्हेंचा दिल्लीत मुजरा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज पहिल्यांदाच लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत पाऊल ठेवलं आहे. संसदेत जाताच कोल्हे यांनी सर्वप्रथम तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेत मुजरा केला आहे. तसेच, छत्रपतींच्या मावळ्याचं संसदेत आज पहिलं पाऊल आणि मुहूर्त शिवराज्याभिषेक दिनाचा, अभिमान, कृतज्ञता आणि जबाबदारी. णत फेसबुकवर पोस्टही शेअर केली आहे.

खासदार अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे राज्यातील घराघरात पोहोंचले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी उमेदवारी लढवत दणदणीत विजय मिळवला. कोल्हे यांनी विजयानंतर प्रथमच संसदभवनात पाऊल ठेवलं त्यानंतर संसदेत जाताच कोल्हे यांनी सर्वप्रथम तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेत मुजरा केला आहे.

कोल्हे यांनी संसदेतील काही छबी फेसबुकवर शेअर केल्या आहेत. आणि त्यासोबतच . ”छत्रपतींच्या मावळ्याचं संसदेत आज पहिलं पाऊल आणि मुहूर्त शिवराज्याभिषेक दिनाचा, अभिमान, कृतज्ञता आणि जबाबदारी! असा मजकूरही शेअर केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!