Share

तीन महिन्यांच्या तान्हुलीसह आईची आत्महत्या

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात येथे एक मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. एका चोवीस वर्षीय विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मुलींमध्ये तीन महिन्यांच्या तान्हुलीचाही समावेश आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, रांजनगाव दांडगा येथील आयेशा शेख हिचा चार वर्षांपूर्वी शेख इरफान बूऱ्हाणसोबत विवाह झाला होता. आयेशा पती इरफान समवेत कुटुंबातून वेगळे राहत होते. त्यांना अलीया शेख (3) आणि तंजीला शेख( वय तीन महीने) ही दोन अपत्ये होती. पती-पत्नीत भांडण होऊन राग अनावर झाल्याने आयेशा दोन्ही मुलींना सोबत घेऊन शेतात गेली. तिने पायातील चप्पल व अंगावरील ओढणी विहीरीच्या काठावर ठेवून दोन्ही मुलींना सोबत घेऊन विहीरीत उडी घेतली.

दीड -दोन तासांनतर शेजारील महिला पाणी पिण्यासाठी विहीरीवर गेली असता तीला विहीरीच्या काठावर चप्पल व ओढणी दिसल्याने त्या महिलेनी विहीरीत डोकावून पाहिले असता तीन महिन्यांची तान्हुली तंजीला चा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले. तातडीने गावात येऊन या घटनेचा कुटुंबियांसह ग्रामस्थांना माहिती दिली.

या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असुन आपल्या आत्महत्येनंतर आपली चिमुकली मुलींचे काय होणार ? म्हणून आई आयेशा हिने आपल्या सोबत ‘त्या’ निष्पापाचाही ‘बळी’ हे ऐकून उपस्थितीनाही अश्रू आवरता आले नाही.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!