औरंगाबाद : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने औरंगाबाद जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी १४ हजार ५०४ उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र, आश्चर्य म्हणजे यासाठी केवळ ६ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. म्हणजेच सुमारे ५६.३२ टक्के विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली आहे.
शहरातील ४७ उपकेंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात झालेल्या या परीक्षेला अनेक विद्यार्थी गैरहजर होते. प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र, ५० टक्के देखील विद्यार्थी उपस्थित नसल्याने अत्यंत शांततेत ही परीक्षा पार पाडली. ८ हजार १६९ विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर होते. म्हणजेच उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ४३.६८ टक्के होती.
परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता औरंगाबाद महानगर पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे दिल्लीतील अधिकारी उपस्थित होते. या परीक्षेच्या कामासाठी १९८९ अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती, अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवार आता जास्त दिवस बाहेर राहणार नाहीत; निलेश राणेंचा दावा
- खेळाडूंसाठी ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय; शासन सेवेत 5 टक्के कोटा राखीव
- ‘शरद पवार आजही कारखानदारांचेच, आम्ही त्यांचे गुलाम नाही’
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- ‘योगी आदित्यनाथ यांना लाज वाटली पाहिजे’, ओवैसींचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

