Share

पुण्यात दिल्लीहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर ! आज सक्रिय रुग्णांमध्येही झाली वाढ

Published On: 

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे शहरात ७ हजारांच्या आसपास रुग्णांची सर्वाधिक संख्या नोंदवण्यात आली होती. आता ही स्थिती आटोक्यात आली असून शहरातील बहुतांश निर्बंध देखील हटवण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका कायम असल्याने नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा पुणे शहराप्रमाणेच राजधानी दिल्लीत देखील कोरोनाने कहर माजवला होता. आता राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या ही मोठ्या प्रमाणात आटोक्यात आली असून आज केवळ ३६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर तिथे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील केवळ ४२७ आहे. याहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद ही पुण्यात केली जात असून आज रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

पुणे शहरात आज नव्याने २६६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ९१ हजार ००८ इतकी झाली आहे. तर, शहरातील २१५ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ८० हजार ०८९ झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात ९ हजार ६०४ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३० लाख २६ हजार ७१६ इतकी झाली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या २ हजार ०५६ रुग्णांपैकी २०२ रुग्ण गंभीर तर २६१ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ८६३ इतकी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!