पुणे : राज्यासह पुण्यातही कोरोनाने थैमान घातले आहे. पुण्यात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. यामुळे जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 6 लाख 76 हजार 14 रुग्णांपैकी 5 लाख 68 हजार 2 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 97 हजार 115 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 हजार 897 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.61 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.02 टक्के आहे. या आकडेवारीमुळे पुणे आणि परिसरात किती भीषण परिस्थिती आहे याची कल्पना तर आपणास आली असेलच मात्र या कोरोना विषाणूमुळे अनेक कुटुंब उद्धस्त होत असल्याचे भयाण वास्तव आता समोर येत आहे.
पुण्यातील जाधव कुटुंबातील एकामागून एक असा कुटुंबियांचा गेल्या 15 दिवसांत कोरोनाने मृत्यू झाला आहे. पूजेच्या निमित्ताने हे कुटुंब एकत्र आलं होतं. पूजेनंतर घरात कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर एकामागोमाग एक कुटुंबियांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सुरुवातीला वैशाली गायकवाड यांचा मृत्यू झाला. यानंतर ३ एप्रिलला रोहित शंकर जाधव (वय ३८) गेले. ४ एप्रिलला त्यांची आई अलका शंकर जाधव (वय ६२) यांचे निधन झाले. तर १४ एप्रिलला ४० वर्षांच्या अतुल शंकर जाधव यांचाही मृत्यू झाला. आता मागे उरले आहेत ती रोहित आणि अतुल यांच्या पत्नी आणि मुलं.एकाच कुटुंबातील सदस्यांचा अशाप्रकारे कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अवघ्या 15 दिवसात संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब मृत्यूमुखी पडल्याने, कोरोनाचं भयाण रुप समोर येत आहे.काही दिवसांपूर्वी अगदी हसतं खेळतं असणारं हे कुटुंब आज होतं असं म्हणायची वेळ आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विनामास्क फिरणे पडले महागात; ५ हजार जणांकडून ६ लाखांचा दंड वसूल
- आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंचे तिहेरी सुवर्णयश
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- औषधांचा सरकारी स्तरावर काळाबाजार? विदर्भ-नागपूरबाबत हेतुपुरस्कर सवती व्यवहार
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नौटंकी पाहून वाईट वाटले : पियुष गोयल


