🕒 1 min read
मुंबई: पत्रकार आणि लेखिका राणा आयुबवर ED (Enforcement Directorate) ने १.७७ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांकडे याप्रकरणी गेल्या वर्षी तक्रार दाखल केली गेली होती. त्यात राणाने ऑनलाइन क्रोउड फनडिंगच्या माध्यमातून लाखों रुपये मदत निधीच्या नावाखाली जमा करून ते दुसऱ्या खात्यावर वर्ग केल्याचा आरोप केला होता. ED ने त्याप्रकरणी बुधवारी १.७७ कोटींची अफरातफरीचा गुन्हा तिच्यावर नक्की केला आहे.
विकास सांकृत्यायन नावाच्या माणसाने गेल्या वर्षी सेप्टेंबर महिन्यात, गाजियाबादच्या इंद्रापूरम पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. राणावर भारतीय दंड विधान आणि आयटी कायद्या व्यतिरिक्त ब्लॅक मनी अॅक्ट च्या सेक्शन ४ नुसार देखील गुन्हा दाखल केला आहे. तिने मदतीच्या नावाखाली लोकांकडून अनधिकृतरित्या पैसे उकळल्याचा तिच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. एकूण रकमेपैकी तिने ५० लाखाची मुदत ठेव केली असून, उर्वरित रक्कम पी एम केर आणि सी एम केर फंड या खात्यांवर वर्ग केली असल्याची माहिती ED ने दिली आहे.
राणा आयुब मुंबईची पत्रकार असून ती सुरुवातीला तहेलका या शोध मॅगझीन मध्ये शोध पत्रकार म्हणून काम करत होती. २०१३ साली तरुण तेजपाल या तहेलकाच्या संपदकाशी तिचे वाद होऊन ती तिथून बाहेर पडली. सेप्टेंबर २०१९ मध्ये तिला वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन वर्तमान पत्राने पत्रकार म्हणून पाचारण केले. तिच्या गुजरात फाइल पुस्तकात तिने स्टिंग ऑपरेशन करून मिळवलेल्या बातम्या आणि रेकॉर्डिंगस प्रसिद्ध केले होते. २००२ गुजरात दंगलींवर हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
महत्वाच्या बातम्या:
- तृणमूल कार्यकर्त्यांवर बलात्काराचा आरोप; देवेंद्र फडणवीस आक्रमक
- पुणे महापालिकेच्या पायऱ्यांचे काँग्रेसकडून शुद्धीकरण; भाजपने सोमय्यांचा केला होता सत्कार
- “मला अनेकांच्या गळ्याचा घोट घ्यायचा आहे…”; गिरीश बापटांचे वादग्रस्त विधान
- “जिनकी इंग्लीश मैने देखी ट्विटरपर, उनका नाम है शशी, और…”; रामदास आठवलेंची कवितेतून टोलेबाजी
- गोवा विधानसभा निवडणूक : फडणवीसांचा तृणमूल कार्यकर्त्यांवर बलात्कारांचा आरोप


