🕒 1 min read
गोवा: गोवा विधानसभा निवडणुकीत भारतातील सर्वच महत्वाचे पक्ष उतरले असून, सत्ताधारी भाजप त्यात आघाडीवर आहे. आज गोव्यातील प्रचार सभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रचार सभेत बोलत होते. त्यांनी यावेळी भाजपच्या गोवा विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा गोवेकरांना सांगितला. त्यातील २२ वचने त्यांनी सांगून गोवेकरांना मताची मागणी केली आहे. तसेच त्यांनी तृणमूल कॉँग्रेस पक्षाला देखील चांगलेच धारेवर धरले होते.
फडणवीस म्हणाले, बंगाल निवडणुकीत तृणमूलने आठ भाजप कार्यकर्त्यांची क्रूर हत्या केली. त्यांचा गुन्हा केवळ एवढाच होता की, ते जय श्री राम म्हणाले, ते भारत माताकी जय म्हणाले. तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या २४ महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार केला. तसेच त्यांनी त्यांची क्रूर हत्या देखील केली असेही आरोप फडणवीसांनी केले.
तृणमूल भारतात बांग्लादेशातील लोकांना घुसवत आहे आणि भारताच्या एकात्मतेला धोका निर्माण करत आहे. तसेच या लोकांच्या जोरावर ते हिंसेचे राज्य बंगालात राबवित आहेत असेही ते म्हणाले. आज जर भाऊसाहेब बांदोडकर जीवंत असते तर त्यांनी तृणमूलला गोव्यात प्रवेश करू दिली नसता असेही त्यांनी वक्तव्य केले. तुम्ही आपले बहुमोल मत अश्या हिंसक पक्षाला मत देऊ नका असे आवाहन गोव्यातील जनतेला केले.
महत्वाच्या बातम्या:
- VIDEO: महाराष्ट्र अनलॉक होणार?
- लोकसभेत विरोधी पक्षांचा सभात्याग; योगी आदित्यनाथ यांच्या भाषणावरून वाद
- “…तर महाविकास आघाडीच्या प्रत्येकVIDEO: कोर्टाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्यानंर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया
- आमदाराची चौकशी लावली असती”; रामदास आठवले
- ‘कधीकधी वाटतं डावा हात कापून टाकावा”, केन विल्यमसननं असं का म्हटलं? नक्की वाचा!


