अयोध्या: अनेक दशके प्रलंबित राहिलेल्या राम मंदिर निर्माणाचे प्रत्यक्ष काम आता सुरु होत आहे. त्यामुळे ५०० वर्षांचा रामाचा वनवास संपल्याची भावना आता व्यक्त केली जात आहे. बाबराने केलेल्या आक्रमणावेळी राम मंदिर पाडून त्या जागी बाबरी मस्जिद उभारली होती. मात्र, आता अनेक वर्षांच्या कोर्टातील संघर्षानंतर राम जन्मभूमीचा ताबा राम मंदिर निर्माण ट्रस्ट ला सोपावण्यात आला.
आज राम मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा अयोध्येत पार पडत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, महंत नृत्य गोपालदास यांच्या उपस्थितीत मंदिराचा शिलान्यास करण्यात आला आहे. यावेळी प्रतिक म्हणून ९ शिलांचे पूजन मोदींच्या हस्ते करण्यात आले.
‘आता देश संपूर्ण जगात मान उंचावून सांगू शकेल की…’
तर, यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या भावना प्रकट केल्या. त्यांनी यावेळी, सर्व कारसेवक, महंत, ज्यांनी ज्यांनी या राम मंदिर निर्माण कार्यासाठी बलिदान दिले, पुढाकार घेतला अशा सर्वांना नमन केले. तसेच कोरोना महामारीमुळे ईच्छा असून देखील अनेकांना अयोध्येत येऊन सहभागी होता आले नसले तरी प्रत्येक जण आहे त्या ठिकाणाहून या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.
मोबाईल कंपनी शिओमी ला भारत सरकारचा मोठा दणका!
तसेच, चराचरात श्री राम असून आपण सारे देखील त्यांचेच आहोत, कोणीही अपवाद नसल्याचे देखील सांगितले. तसेच जगाला प्रेरक भारत असून येणाऱ्या काळात हे मंदिर सर्वांना आकर्षित करून ऊर्जा देत राहील असे सांगत, अखेर तो दिवस आला असून येणाऱ्या काळात मंदिर आपल्या समोर उभे राहील अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली.
अनिलभैय्या गेले ही वाईट बातमी कळली आणि धक्काच बसला, उद्धव ठाकरेंना भावना अनावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

