नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील सेंच्युरियनमध्ये खेळला जाणारा तिसरा कसोटी सामना एका रोमांचक वळणावर पोहोचला आहे. भारतीय संघाला आता हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. मात्र, त्यासाठी भारताला त्यांचा दुसरा डाव योग्य वेळी घोषित करावा लागेल. संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) भारतीय संघ आपला दुसरा डाव कधी घोषित करू शकतो हे सांगितले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटी सामन्यात भारतीय संघाने आपली स्थिती मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवसानंतर भारताने दुसऱ्या डावात 16/1 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १९७ धावांत आटोपला. भारताची एकूण आघाडी १४६ धावांवर गेली आहे. क्रीजवर केएल राहुल ५ आणि शार्दुल ठाकूर ४ धावांवर नाबाद आहेत.
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवायचे आहे, जे विरोधी संघाला गाठता येणार नाही. संघात अजूनही अनेक दिग्गज फलंदाज आहेत. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत आणि केएल राहुल अजूनही शाबूत आहेत. भारतीय संघ वेगवान फलंदाजी करू शकतो.
भारतीय संघ 400 च्या आसपास लक्ष्य ठेवू इच्छितो : मोहम्मद शमी
दुसरीकडे मोहम्मद शमीने टीम इंडिया कधी डाव घोषित करू शकते हे सांगितले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला, अजून दोन दिवसांचा खेळ बाकी आहे आणि मला वाटतं की चौथ्या दिवशी आम्ही जास्तीत जास्त वेळ फलंदाजी करू. जर आम्ही 250 च्या आसपास धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेला 400 धावांचे लक्ष्य दिले तर त्यांना बाद करण्यासाठी आमच्याकडे चार सत्रे असतील. मात्र, त्यासाठी आम्हाला किमान 350-400 धावांची आवश्यकता असेल.
महत्वाच्या बातम्या
- ‘भ्रष्टाचाराच्या दृष्टीने विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर केले’, भाजपचा आरोप
- ‘कुणावर हल्ला घडवून आणण्याची वृत्ती वाळव्याच्या पाटलांची नाही’, राऊतांकडून जयंत पाटलांची पाठराखण
- “भाजप पुढाऱ्यांच्या डोक्याचा केमिकल लोचा”, संजय राऊतांची खोचक टीका
- “विरोधी पक्ष मांजरीचा वंशज असल्याने…” ; शिवसेनेची खोचक टीका
- ‘श्रीधर नाईकापासून, रमेश गोवेकरांपर्यंत ज्या हत्या झाल्या त्याच मालिकेत संतोष परबांनाही बसवायचे होते’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

