Share

मोदी आज करणार वाराणसीत उमेदवारी अर्ज दाखल, उद्धव ठाकरेंही राहणार उपस्थित

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, गुरुवारी मोदी यांनी रोड शो करत शक्तिप्रदर्शन केले होते. यावेळी भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील यावेळी विशेष उपस्थिती लावणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात वाराणसी लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे, २०१४ साली मोदी हे विक्रमी मतांनी विजयी झाले होते. मै यहां आया नही हूं, मुझे मां गंगाने बुलाया है, म्हणत मागील निवडणुकीत मोदींनी मतदारांचे लक्ष वेधले होते. आता पुन्हा एकदा वाराणसीमधून ते लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत.

दरम्यान, कॉंग्रेसकडून मोदी विरोधात प्रियांका गांधी लढणार असल्याची चर्चा सुरु होती, मात्र अखेर काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. अजय राय हे २०१४ मध्येही मोदींविरोधात रिंगणात उतरले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!