🕒 1 min read
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसीतील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी भावुक झाले होते. व्हिडिओ कॉन्फरन्समधला मोदींचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातच आता आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आपण मोदींबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा केला आहे.
आम आदमी पार्टीने जारी केलेल्या अधिकृत पत्रकामध्ये संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल व्यक्त केलेली शक्यता खरी ठरली आहे. राज्यसभेतील आपचे खासदार असणाऱ्या संजय यांनी १७ एप्रिलच्या एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलेलं भाकित २१ मे रोजी खरं ठरलं, असं आपने म्हटलं आहे.
जो 17 अप्रैल को बोला था
21 मई को सच हो गया।
देश को एक संवेदनशील नेक दिल इंसान चाहिये
ढोंगी प्रधानमंत्री नही जो खुद रैली करके कोरोना फैलाए और बाद में रोने का नाटक करे। pic.twitter.com/lDvQQmvlmw— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) May 21, 2021
१७ एप्रिल रोजी दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय यांनी, “अजून थोडा दिवस वाट पाहा. ते (पंतप्रधान मोदी) तुमच्यासमोर येतील. ते फक्त त्यांच्या लाईट्स आणि कॅमेरासाठी वाट पाहत आहेत. ते टीव्हीवर रडतील आणि देशभरातील वृत्तवाहिन्या पंतप्रधान कशापद्धतीने भावूक झाले आणि रडू लागले यासंदर्भातील बातम्या चालवतील,” असं म्हटलं होतं.
दरम्यान, देशाला एक संवेदनशील आणि चांगल्या मनाचा माणूस म्हणून हवा आहे, असला ढोंगी पंतप्रधान नको ज्यांनी रॅली काढून कोराना पसरवला अशा शब्दात संजय सिंगांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारलं; मुख्यमंत्री म्हणाले…
- ‘मुख्यमंत्री साहेब…चक्रीवादळाला लाजवेल, असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता’
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
- भारतात कोरोनाचा हाहाकार ; ‘या’ राज्याने वाढवला ७ जूनपर्यंत लॉकडाऊन
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

