मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असून मागील लाटेपेक्षा यंदा स्थिती गंभीर झाली आहे. ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत अभिनेत्री ट्विंकल खन्नाने मदतीचा हात पुढे केला आहे.
https://twitter.com/mrsfunnybones/status/1393855912356450307?s=20
काही दिवसांपूर्वी ट्विंकल खन्नाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केले होते. त्यात तिने अधिकृत आणि विश्वासार्ह एनजीओची माहिती मागितली होती. जे रुग्णांच्या मदतीसाठी ऑक्सिजन सिलेंडर पुरवतात. मी त्यांना थेट लंडनवरुन ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करेन असं म्हंटल होत.
अभिनेत्री ट्विंकलने दिलेले हे वचन पूर्ण केले आहे. ट्विंकलने सोशल मीडियावर पंजाब आणि दिल्लीत ऑक्सिजन कंसंट्रेटरचा तिसरा लॉट वितरित केल्याचे फोटो शेअर केले आहेत. यापूर्वी तिने दिल्लीत कोव्हिड १९ झालेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजन कंसंट्रेटरची यशस्वी व्यवस्था केली होती. तिने आपल्या ट्विटमध्ये ज्या संघटनांचे आभार मानले आहेत ज्यांनी कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मंत्रालयात स्वतः उपस्थित राहून अजितदादा ठेवत आहेत वादळ परिस्थितीवर बारकाईने लक्ष
- पेट्रोलसह खतांच्या किंमती वाढल्या, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार
- गेल्या दहा वर्षात भारतीय महिला संघाला लाभले १० प्रशिक्षक; प्रत्येक वर्षी नविन प्रशिक्षकाची निवड
- इंग्लंडला जोरदार झटका ; जोफ्रा आर्चर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
- तौक्ते चक्रीवादळाचा महावितरणला तडाखा,अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणची कसरत


