Share

मोदी म्हणाले एक, आणि आमदारांनी केले एक

Published On: 

लातूर : ‘व्होकल फॉर लोकल’ असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केलंय. इतकेच नाही तर तुम्ही जी स्वदेशी वस्तू खरेदी करताल, त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचा ट्रेंडही सुरू झालाय. त्याचच एक भाग म्हणून भाजपचे नेते आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्वदेशी वस्तू खरेदी केलीय. विशेष म्हणजे या स्वदेशी आवाहनात मोदींनी गांधीजींचा चरखा जोडत हस्तकलेच्या वस्तू खरेदीचे आवाहन केले होते. मात्र, आमदार पाटील यांची हस्तकलेची वस्तू नाही तर चक्क कार खरेदी केलीय.

ही कार खरेदी केल्यानंतर संभाजी पाटील निलंगेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही केलीय. या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘वस्तू कोणतीही असो, सजगतेने आपल्या भातात बनणाऱ्या स्वदेशी वस्तूंची निवड करावी, हाच विचार ही कार घेताना केला होता. कोरोनाच्या संकट काळात रतनजी टाटा यांनी देशाला मोठे आर्थिक सहकार्य केले होते व पुढाकार घेतला होता. त्यांच्याविषयी कृतज्ञता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ या घोषणेला प्रतिसाद म्हणून या भारतीय गाडीस प्राधान्य दिले.’

वास्तविक मोदींनी आसाम, पश्चिम बंगालमध्ये तयार होणाऱ्या छोट्या हस्तकलेच्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले होते. मात्र, निलंगेकरांनी कार खरेदी करतानाही स्वदेशीला प्राधान्य दिले. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी मोदींचे आवाहन पाळले असेच म्हणता येईल. कारण काहीही असो, स्वातंत्र्यापूर्वी दिलेली स्वदेशी वस्तूंची हाक आजही परिणामकारक ठरतेय, हे नक्की.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!