Share

‘मोदींना नवाब शरीफांची भेट घ्यायला परवानगी लागत नाही, मग शेतकऱ्यांची भेट घ्यायला परवानगी लागते का ?’

Published On: 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. या आंदोलनाला राज्यातून पाठींबा देण्यात येत असून शिवसेनेने देखील वेळोवेळी शिवसेनेनं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत कृषी कायद्याविरोधात आक्रमक भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सीमेवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून गाझीपूर बॉर्डर येथे त्यांनी शेतकरी नेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी नेत्यांसोबत गळाभेट घेतलेले फोटो चांगलेच व्हायलर झाले आहेत. तर, संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी उचललेल्या पावलाचा निषेध देखील केला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली सीमेवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेण्यापूर्वी परवानगी घेतली होती का? असा सवाल केला असताना, ‘शेतकऱ्यांना भेटायला परवानगी लागते का? असा प्रतीसवाल उपस्थित करत राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

‘देशातील शेतकरी आंदोलन करत असेल, तर त्यांना भेटायला  परवानगी लागते का? आमच्या पंतप्रधानांना नवाब शरीफांना भेटायला परवानगी लागत नाही. मग आम्हाला शेतकऱ्यांना भेटायला परवानगी लागते का? तिथे खिळे ठोकून बॅरिगेट्स लावले आहेत. हेच जर तिथे चीनच्या सीमेवर लावले असते, तर चीनचे सैन्य आत घुसले नसते. जो बंदोबस्त केला तो अभूतपूर्व आहे’ असे म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. याबाबत झी २४ तास वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!