मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्रात कोरोनाला ब्रेक दि चेनच्या नावाखाली रोखण्याचे काम सुरू आहे. पण कोरोना ती चेन ब्रेक करून सुसाट धावतोय. शुक्रवारी दिवसभरात ६३ हजार ७२९ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे तब्बल ५९ हजार ५५१ जणाचा कोरोनाने बळी घेतला आहे.
राज्य सरकारने अनेकदा आवाहन करूनही नागरिक नियम पाळत नाहीयेत. त्यामुळे रुग्णांची संख्या बेसुमार वाढत आहे. अशा वेळी राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक शायरी पोस्ट केली. त्याद्वारे त्यांनी लोकांना कोरोनाचे नियम पाळण्याबाबत आवाहन केले आहे.
सच झूठ का फैसला अब कब्रस्तान और समशान करेगा,
क्योंकी कब्रस्तान और समशान झूठ नहीं बोल सकता.
इस देश को संभालो मेरे यारो,
एक ही काम करो…
घर से बाहर मत निकलो.— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 17, 2021
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी आव्हाड यांनी थेट कवितेतून भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता. कोरोना संसर्गामुळं राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यावरुन भाजप नेत्यांनी सरकारला घेरलं आहे. भाजप नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आव्हाडांनी थेट कवितेचा मार्ग निवडला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ‘खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’, असं शीर्षक असलेली कविता फेसबुकवर पोस्ट केली आहे. आव्हाडांनी उपरोधित शैलीत ही कविता लिहली असून भाजपच्या नेत्यांना टोला हाणला आहे. कोरोना संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेले निर्णय आणि त्यांच्यावर झालेली टीका याबाबत त्यांनी या कवितेत भाष्य केलं आहे. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कशाप्रकारे राज्यातील परिस्थिती हाताळतायेत हे सुद्धा या कवितेत त्यांनी मांडलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- फायदा फक्त व्यापाऱ्यांनाच! सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ, भाव ७ हजार प्रतिक्विटंल
- रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री, मेडिकल चालकाविरोधात पोलिसांत तक्रार
- धनंजय मुंडेच्या पुढाकाराने रेमडेसिविर इंजेक्शन मोफत मिळणार
- ‘प्रसिद्धीसाठी काही लोकांकडून रेमडेसिवीरचे वाटप’, धनंजय मुंडेंवर पंकजांचा निशाणा

