मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. पंधरा दिवसांच्या या निर्बंध काळात अगोदप पाच रुपयांना मिळणारी शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे महाविकास आघाडीचे नेते मोठा गाजावाजा करत आहेत. शिवभोजन थाळीमुळे अनेकांना जेवण मिळत असल्याची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण शिवभोजन थाळीच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला आहे.
“माननीय मुख्यमंत्री (मा .मु.) कुछ समझ में नही आया… मामु शिवभोजन थाळी खानेका है… लेकिन जानेका कैसे?”, असा प्रश्न विचारत गोपीचंद पडळकरांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलीस अडवताना दिसत आहेत. तर काहींना घराबाहेर पडले म्हणून शिक्षा देताना दिसत आहे.
‘माननीय मुख्यमंत्री (मा .मु.) कुछ समझ में नही आया… मामु शिवभोजन थाळी खानेका है..लेकीन जानेका कैसे?’#गोलमाल#शिवभोजन_थाळी#lockdown#बिघाडी_सरकार pic.twitter.com/jkHXVZyB8E
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) April 17, 2021
शिवभोजन सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी हा निर्णय म्हणजे भ्रष्ट्राचार करण्याची मुभा असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केलाय. शिवभोजन थाळीला आता वर्ष होत आले आहे. मात्र, त्याचा किती फायदा सामान्यांना झाला हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आता घराबाहेर पडायचे असेल तर केवळ शिवभोजन थाळी हा एकमेव पर्याय असल्याचे मीम सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, राज्यात शिवभोजन थाळी मिळण्याच्या ठिकाणांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यातच या केंद्रांकडे पार्सल सुविधा देण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा खरा किती फायदा होईल, या बाबत साशंकता कायम आहे. एकूणच काय तर, राज्यातील एकही गरजवंत उपाशी राहू नये, यासाठी व्यापक स्थरावर प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- फायदा फक्त व्यापाऱ्यांनाच! सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ, भाव ७ हजार प्रतिक्विटंल
- रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री, मेडिकल चालकाविरोधात पोलिसांत तक्रार
- ‘सच झूठ का फैसला अब कब्रस्तान और समशान करेगा’, शायरीमधून आव्हाडांचे आवाहन
- ‘प्रसिद्धीसाठी काही लोकांकडून रेमडेसिवीरचे वाटप’, धनंजय मुंडेंवर पंकजांचा निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

