🕒 1 min read
टीम महारष्ट्र देश : गृह मंत्रालयाची पदभार स्वीकारताच अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरु केली आहे. तर जम्मू-काश्मीरबाबत बैठका सुरु झाल्या आहेत.या बैठकांमध्ये जम्मू-काश्मीरच्या विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्याबाबत चर्चा सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या मतदारसंघ पुनर्रचना आयोगाचं लवकरच गठन करण्यात येणार आहे. राज्यातील काही जागा SC/ST प्रवर्गासाठी आरक्षित ठेवल्या जावू शकतात.
तीन दिवसापूर्वी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. राज्यपाल मलिक यांनी अमित शहा यांची भेट घेत जम्मू-काश्मीरवर एक ३ पानांचा अहवाल सादर केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, या अहवालात जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच पुनर्रचना आयोगाची नियुक्ती केली जावू शकते.
पुनर्रचना आयोगाच्या अहवालानंतर जम्मू-काश्मीरमधील विधानसभा मतदारसंघाच्या सीमा बदलण्यात येणार आहेत. तर काही जागा या आरक्षित केल्या जाणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या असलेले मतदारसंघ योग्य प्रकारे नसल्याचं केंद्र सरकारचं मत आहे. जम्मूसोबत न्याय होत नसल्याचा त्यांचं मत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
