मुंबई: महाराष्टात कोरोनाचे संकट असल्याने चित्रिकरणावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असली तरी म्हणावे तसे कोरोनाचे संकट संपले नाही. याच विषयी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत सरकावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी ट्वीट करत, कोरोना काळातील नियम तोडणाऱ्या चित्रपट निर्मात्यांवर टीका केली आहे.
राज्य सरकारने मुंबईत संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच शूटिंगची परवानगी दिलेली आहे आणि तेही बायो-बबलमध्ये. मराठी निर्मात्यांकडून हे नियम काटेकोरपणे पाळले जातायत पण अनेक ठिकाणी हिंदी निर्मात्यांकडून या नियमांचं उल्लंघन होत आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 16, 2021
अमेय खोपकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ‘राज्य सरकारने मुंबईत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शुटींगला परवानगी दिली आहे. तेही बायो-बबल बायो-बबलमध्ये. मराठी निर्मात्यांकडून हे नियम काटेकोरपणे पाळले जातायत पण अनेक ठिकाणी हिंदी निर्मात्यांकडून या नियमांचं उल्लंघन होतं आहे’.
कोरोनाचं संकट अजून दूर झालेलं नाही असं खरंच यंत्रणांना वाटत असेल तर मग त्यांनी जे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक दाखवावी.
आणि जर कोरोनाचे आकडे कमी होत असतील तर सरकारने शूटिंगसाठी बनवलेल्या नियमांचा नव्याने विचार करावा,तरच या इंडस्ट्रीत सगळंकाही पुन्हा सुरळीत होऊ— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 16, 2021
अमेय खोपकर पुढे म्हणाले की, ‘कोरोनाचं संकट अजून दूर झालेलं नाही, असं खरंच यंत्रणांना वाटत असेल तर मग त्यांनी जे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक दाखवावी. आणि जर कोरोनाचे आकडे कमी होत असतील तर सरकारने शुटिंगसाठी बनवलेल्या नियमांचा नव्याने विचार करावा, तरच या इंडस्ट्रीत सर्वकाही सुरळीत होऊ शकेल’. असंही त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेना भवनासमोर राडा ; भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले
- एसबीआय बँकची ‘ही’ सेवा काही तासांसाठी उद्या राहणार बंद
- शेतकऱ्यांच्या नावे 22 कोटी 11 लाख रुपयांचे कर्ज परस्पर काढले, आ. शिंदेच्या विरोधात शेतकरी आक्रमक
- ‘मोदी सरकारने मर्जीनेच दोन लसींच्या डोसमधील अंतर वाढवले’, राहुल गांधींचा गंभीर आरोप
- कधी होणार महाराष्ट्रात CET परीक्षा ? उदय सामंतांनी दिली महत्त्वाची माहिती

