Share

मोदी सरकारची मोठी घोषणा; संपूर्ण जगाला आता भारत कोरोना लस पुरवणार

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची व्हायरस हळूहळू मंदावत आहे. नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. गेले दोन दिवस नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाल्यानंतर आणि पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे.

दरम्यान, आता पुढील महिन्यापासून भारत पुन्हा एकदा संपूर्ण जगाला कोरोनाविरोधातील लसींचा पुरवठा करणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ही घोषणा केली आहे. खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर भारताने जगातील काही देशांना लसींचा पुरवठा केला होता. मात्र देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर बाहेरील देशांना होणारा लसींचा पुरवठा थांबवण्यात आला होता.

याबाबत आरोग्यमंत्री बोलताना म्हणाले कि, व्हॅक्सिन मैत्रींतर्गत भारत संपूर्ण जगाला मदत करणार आहे. तसेच चौथ्या तिमाहीमध्ये कोव्हॅक्समध्ये योगदान देणार आहे. आम्हाला पुढच्या महिन्यात कोरोनाविरोधी लसींचे ३० कोटींहून अधिक डोस मिळण्याची अपेक्षा आहे. लसींचे उत्पादन वाढणार आहे. याचं कारण म्हणजे जैविक ई आणि इतर कंपन्या आपल्या लसी बाजारात आणणार आहेत.

कोव्हॅक्स एक जागतिक पाऊल आहे, त्याला औपचारिकपणे कोविड-१९ लसीची जागतिक पुरवठा सुविधा म्हणून ओळखले जाते. मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांना कोरोनावरील लसीचे डोस वेळेत मिळावे, हे सुनिश्चित करणे हे याचे लक्ष्य आहे. तर देशामध्ये कोरोना विषाणूविरोधातील सुरू असलेल्या लसीकरणाच्या अभियानांतर्गत आतापर्यंत ८१ कोटींहून अधिक व्यक्तींना लसीचे डोस देण्यात आले आहे. त्यांनी सांगितले दरम्यान, १० कोटी डोस तर केवळ ११ दिवसांत दिले गेले, अशी माहिती देखील यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी यावेळी बोलताना दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!