Share

कुरापती करणाऱ्या चीन-पाकला मोदींनी दिला सज्जड दम!

Published On: 

नवी दिल्ली: आज देशभरात कोरोनाचे सावट असताना देखील राष्ट्रीय सण असलेला स्वतंत्रता दिवस सोशल डिस्टनसिंगचे भान राखत देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना स्मरण करून करून साजरा केला जात आहे. तर, या ७४ व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर सबंध देशाला संबोधित केले.

आज, नरेंद्र मोदी यांनी देशातील अनेक योजनांसह कुरापती करणाऱ्या चीन-पाकबाबत आक्रमक पवित्रा घेतलेला यावेळी दिसून आले. सुरुवातीला कोरोना महामारीच्या युद्धात लढणाऱ्या डॉक्टर, नर्स, रुग्णालय कर्मचारी, पोलीस, रुग्णवाहिका चालक यांसह सर्व कोरोना योद्धयांना नमन करत त्यांचे कौतुक केले. तसेच या कोरोनाने आपल्याला आता आत्मनिर्भरतेसाठी नवी दिशा दिली असून या काळात भारतात न बनणाऱ्या वस्तूंची निर्मिती देखील आता सुरु झाल्याचे त्यांनी नमूद केले. लडाखला तेथील जनतेच्या मागणी नुसार केंद्रशासित प्रदेश करण्यात आले असून तेथील विकास वेगाने सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

‘महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे’ – उद्धव ठाकरे

यानंतर, त्यांनी चीन आणि पाकला चांगलेच लक्ष्य केले. काही महिन्यांपूर्वी संपूर्ण जगाने लडाखमध्ये भारतीय सैन्याने दिलेले चोख प्रत्युत्तर व त्यांची शूरता बघितली असून आपल्या देशाला लागून समुद्री व जमिनी सीमा असलेल्या देशांना देखील ठणकावून सांगतो जर काही आगळीक केलीत तर भारत जशास तसे उत्तर देण्यास तयार आहे. तसेच चीनशी सामना करताना प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना देखील त्यांनी लाल किल्ल्यावरून देशातर्फे श्रद्धांजली व नमन करत असल्याचे मोदींनी सांगितले.

प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

तर, २१ व्या शतकातल्या तिसऱ्या दशकात पदार्पण करताना भारत आता आत्मनिर्भरतेच्या उंबरठ्यावर असून आपल्या सर्व हुतात्म्यांनी, स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरित असा देश आपण आता घडवण्याच्या जवळ असून या कोरोना काळात आपल्याला आत्मनिर्भरतेचे महत्व पटवून दिले आहे त्यामुळे किती दिवस आपण बाहेर कच्चा माल देणार आणि पक्का माल जास्त किंमतीने आयात करणार असा सवाल केला. तसेच संरक्षण दलांनी घेतलेल्या १०१ वस्तूंच्या आयातीवरील बंदीचा उल्लेख देखील त्यांनी केला असून आता छोटे-मोठे हेलिकॉप्टर्स, अनेक सैनिकी साहित्य आता स्वदेशात बनवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक देखील त्यांनी केले.

स्वातंत्र्य दिवस: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण, पहा फोटो

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!