Share

‘महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे’ – उद्धव ठाकरे

Published On: 

मुंबई : ‘महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ५८ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत. यात उत्कृष्ट सेवेकरिता ५ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ पोलीस शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

या सर्वांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे, असे नमूद केले आहे. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र पोलिसांचे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ब्रीद उंचावणारी कामगिरी केली आहे. या कामगिरीसाठी सर्वांना सलाम, आणि जाहीर पुरस्कारासाठी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असेही त्यांनी म्हटले आहे.

स्वातंत्र्य दिवस: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण, पहा फोटो

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!