पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा (रक्तद्रव) उपचार पद्धती यशस्वी ठरत असल्याने अधिकाधिक व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
प्लाझ्मा दाते आणि प्लाझ्मा स्वीकृते यांच्या मध्ये समन्वय यासाठी मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा प्रयत्न करत आहे. यासाठी http://puneplasma.in हे ॲप विकसित करण्यात आले आहे. शासकीय निर्णय आणि कायदेशीर बाबी लक्षात घेऊन यामध्ये समन्वय साधला जात आहे. ॲपवर प्लाझ्मा दान करण्यासाठी ३३ जणांनी इच्छा प्रदर्शित करून नोंदणी केली आहे तर ६१ जणांनी प्लाझ्माची मागणी केली आहे.
स्वातंत्र्य दिवस: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण, पहा फोटो
प्लाझ्मा दात्यांच्या कुटुंबातील सदस्याला भविष्यात प्लाझ्माची गरज भासल्यास त्यांना प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे प्लाझ्मा दात्यांनी कोणतीही शंका मनात न ठेवता पुढे यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यात शुक्रवारी १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०९ टक्के एवढे आहे. आज १२ हजार ६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५१ हजार ५५५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
स्वातंत्र्य दिवस: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘कोरोना लस’बाबत केली मोठी घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

