Share

अखिलेश यादव आणि मायावतींच्या मूर्खपणामुळे मोदी दोनदा पंतप्रधान झाले- असदुद्दीन ओवैसी

Published On: 

🕒 1 min read

उत्तर प्रदेश: एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाना साधला आहे. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि बसपाच्या मायावती यांच्या मूर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनदा पंतप्रधान झाले, असं वक्तव्य खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलं आहे. त्यांनी सुल्तानपूरमध्ये हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी अयोध्येतील रुदौली येथून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचा प्रचार सुरू केला आहे. यावेळी त्यांनी सुलतानपूर जिल्ह्यातील ओड्रा गावात एका जाहीर सभेत हे वक्तव्य केले आहे.

यावेळी त्यांनी सुलतानपूरमध्ये सर्वांनी अखिलेश यादव यांना मतं दिली तर तिथून भाजपाचे आमदार सूर्यभान सिंह कसे निवडून आले. तसेच २०१९ मध्येही लोकसभा निवडणूक भाजपाने कशी जिंकली. तेव्हा तर मी निवडणूक लढवत नव्हतो, असा सवाल त्यांनी केला. निवडणुकीनंतर अखिलेश यादव म्हणाले की हिंदूंनी मतदान न केल्याने मी हरलो असं न म्हणता, मुसलमानांनी मत न दिल्याचा आरोप केला. मुसलमान काय कैदी आहेत का, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही टोला लगावला आहे. केंद्राने उत्तर प्रदेशातील अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी ११६ कोटी रुपये दिले होते, परंतु त्यांनी त्यापैकी फक्त १० कोटी रुपये खर्च केले आहेत. असा आरोप खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!