🕒 1 min read
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना सुमारे १.५७ लाख कोटी रुपयांचे नऊ हप्ते दिले आहेत. रक्कमेचे वाटप केल्यानंतर मोदींनी या योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तेलांचे उत्पादन वाढवण्यासाठी एका योजनेची घोषणा केली.
पाम तेलासह स्वयंपाकाच्या तेलांमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नॅशनल एडिबल ऑईल मिशन-ऑईल पाम या योजनेची घोषणा केली आहे. यामुळे देश तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर दिला असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे देश य योजनेमुळे स्वयंपूर्ण होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान त्यांनी देशातील खाद्यतेल आणि डाळींच्या कमतरतेबद्दल चिंता व्यक्त करत देशांतर्गत विविध योजना राबवून यावर भर देणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी हे विधान केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं केंद्राने द्याव मी फक्त घरात बसणार, नाहीतर मर्सिडीज चालवणार’; भाजपची टीका
- रेल्वे प्रवासासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी; मनसेच्या ‘या’ प्रश्नांची उत्तरं सरकार देणार काय ?
- सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच कटकारस्थान होते ?
- मराठा आरक्षण : पुण्यात आज राज्यस्तरीय बैठक; संभाजीराजेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
- ‘मोदी सणासुदीला गर्दी होणार असल्याने चिंतेत,तर राज्यातील भाजपनेते मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
