🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुलाखतीला सामोरे गेले. सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांसह भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसेच त्यांनी बंडखोर आमदाराकडून विचारल्या जाणाऱ्या अनेक प्रश्नावर आपले मत व्यक्त केले. माझं जे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे ते आजही कायम आहे. मी तर शिवसेनेचाच आहे. मी पक्षप्रमुख आहे. पण माझा हेतू तो नव्हता. मी मुख्यमंत्री होणार असे मी बोललो नव्हतो आणि वचन पूर्ण केल्यानंतरसुद्धा मी काय दुकान बंद करून बसेन? शिवसेना मला वाढवायची आहे. असे उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले होते. मात्र दुसरीकडे पुन्हा एकदा मनसेकडून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल सुरू आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.
राज्यात एकनाथ शिंदे सरकार आल्यापासून संदीप देशपांडे यांनी अनेक वेळा शिवसेनेला धारेवर धरले आहे. ते शिवसेनेवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. या अगोदरही त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय वारसाबद्दल उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “काँग्रेसने कधीच दावा केला नाही की महात्मा गांधी त्यांचेच, हिंदू महासभा कधीच म्हणाले नाही की सावरकर आमचेच, बाबासाहेब आंबेडकर तर देशाचेच मग तुमच्या मनात हा पझेसिव्हपणा का आहे? हा पझेसिव्ह नेस आहे की असुरक्षितता?” अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.
काँग्रेस ने कधीच दावा केला नाही की महात्मा गांधी त्यांचेच, हिंदू महासभा कधीच म्हणाले नाही की सावरकर आमचेच, बाबासाहेब आंबेडकर तर देशाचेच मग तुमच्या मनात हा पझेसिव्ह पणा का आहे?हा पझेसिव्ह नेस आहे की असुरक्षितता?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 27, 2022
संदीप देशपांडे यांनी या अगोदरही शिवसेनेवर अनेक वेळा टीका केलेली आहे. ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा!’ यासोबत संदीप देशपांडेंनी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा एक फोटोही शेअर केला होता. महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात घडलेल्या राजकीय भूकंपानंतर राज ठाकरे यांच्या फोटोसह संदीप देशपांडे यांनी केलेल्या या ट्वीटचे अनेक अर्थ राजकीय जाणकारांकडून काढले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- महाराष्ट्र सुपर मॉडेलचा महाअंतिम सोहळा संपन्न
- डिळी कादंबरीत गावखेडे आणि निमशहरी जगण्याची प्रगल्भ मांडणी – रंगनाथ पठारे
- Deepali Sayed | “रुसलेल्या, चुकलेल्या सैनिकांना माफ करा” ; दीपाली सय्यद यांची उद्धव ठाकरेंना विनंती
- Sanjay Raut : “ये दोस्ती….हम नही तोडेंगे”, संजय राऊतांच्या उध्दव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
- Sanjay Raut | बाळासाहेब ठाकरे यांनी माकडांची माणसे केली – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
