Share

Sanjay Raut : “ये दोस्ती….हम नही तोडेंगे”, संजय राऊतांच्या उध्दव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यापासून आजपर्यंत संजय राऊत हे प्रचंड चर्चेत राहिले. शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे ला पाठिंबा दिल्यामुळे पक्षाला मोठी गळती लागली आहे. या बंडानंतर संजय राऊत यांना बंडखोर आमदारांकडून मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला. कारण हिंदुत्व आणि महाविकास आघाडीसह संजय राऊत यांनाही बंडाचे कारण म्हटले जात होते. तर दुसरीकडे संजय राऊत हे, मी एक सच्चा शिवसैनिक असून शिवसेनेसाठी शेवटपर्यंत लढत राहील असे सांगत होते. दरम्यान आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतचा एक जुना फोटो पोस्ट करत त्यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

संजय राऊत यांनी फेसबुकवर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना त्यांनी उद्धव ठाकरेंना खास दोस्त संबोधले आहे. फोटोमध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे असल्याचे दिसत आहे. तसेच दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. हाच फोटो पोस्ट करुन राऊतांनी उद्धव ठाकरेंना मित्र म्हटलंय. तसेच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो अशी इच्छा व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राऊतांनी लिहिले की, “ये दोस्ती….हम नही तोडेंगे…आपण आमच्या आयुष्यात खास आहात…वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उदंड आणि निरोगी दीर्घ आयुष्य लाभो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.’अशा शुभेच्छा देताना शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख म्हणुन उल्लेख करण्याचे टाळले आहे. त्याऐवजी त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. शिंदेंच्या या शुभेच्छांमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!