🕒 1 min read
मुंबई: आयपीएल २०२२मध्ये पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून रोहित शर्माच्या मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. मात्र पहिले फलंदाजी करूनही मुंबईला स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. केकेआरकडून वेंकटेश कमिन्सच्या दमदार खेळीने मुंबईला ५ विकेट्सने परास्त केले.
सामन्यात मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) अर्धशतकी खेळी करत मुंबई इंडियन्सला २० षटकात ४ बाद १६१ अशी धावसंख्या गाठून दिली आहे. शेवटच्या षटकात कायरन पोलार्डने केलली फटकेबाजी मुंबईच्या चाहत्यांसाठी आनंददायी ठरली. तर राजस्थानच्या गोलंदाजीत आयपीएल २०२२चा पहिला सामना खेळणाऱ्या पॅट कमिन्सने (pat cummins) २ विकेट्स पटकावल्या.
मुंबईच्या १६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर रहाणे बाद झाल्यानंतर खेळी ढासळताना दिसली. मात्र दुसऱ्या टोकावर सलामीला आलेल्या वेंकटेश अय्यरने (venkatesh iyer) एका बाजूने जोरदार फटकेबाजी सूरु ठेवली. एका बाजूने सतत विकेट्स पडत असताना वेंकटेशने अर्धशतकीय खेळी केली. ५ विकेट्स पडल्यानंतर त्याला पॅट कमिन्सची साथ लाभली. पॅटने गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केल्यानंतर फलंदाजीतही आग लावली. त्याने आयपीएलयामध्ये अवघ्या १४ चेंडूत इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक केले आहे. एकूणच पॅट कमिन्सच्या आगमनाने केकेआरने धमाकेदार कामगिरी केली आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 KKR vs MI : पुण्यात पॅट पेटला..! मुंबईविरुद्ध कमिन्सची रेकॉर्डतोड फलंदाजी; नक्की वाचा!
- IPL 2022 : बेबी एबीच्या रुपात मुंबईला मिळाला खरा डिव्हिलियर्स? पदार्पणात खेळला ‘नो लूक’ शॉट; पाहा VIDEO!
- IPL 2022 MI vs KKR: रोहित शर्माचा ‘फेव्हरेट शॉट’च ठरला अडचणीचा, उमेश यादवने जाळ्यात अडकवले!
- IPL 2022 KKR vs MI : सूर्यकुमारचं दमदार पुनरागमन..! मुंबई इंडियन्सचं कोलकात्याला १६२ धावांचं आव्हान
- IPL 2022: ‘जेव्हा ‘तो’ चांगला खेळतो तेव्हा मला माझ्या स्वतःच्या मुलाने परफॉर्म केल्यासारखे वाटते’; एमएसके प्रसादचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
