मुंबई : दसरा मेळावा परवानगीच्या वादावरुन मनसेने शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. शिवसेनेला टोमणे मेळाव्यासाठी परवानगी द्यावी, असे ट्वीट मनसेनेते गजानन काळे यांनी केले आहे. मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नका, असे म्हणत गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
“मुंबई मनपा व राज्यसरकारने शिल्लक सेनेला शिवतीर्थावर टोमणे मेळाव्यासाठी परवानगी देवून टाकावी. तसेच खंजीर, मर्द, मावळा, वाघनखं, गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये. तसेही यावेळची स्क्रिप्ट बारामती वरून येणार आहे. अबू आझमी व ओवेसी स्टेजवर असणार आहेत का?”, असा प्रश्न गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना आक्रमक-
दसरा मेळाव्यावरुन राज्यात राजकारण चांगलच तापल आहे. शिंदे गट आणि मुळ शिवसेना दसरा मेळावा घेणार आहेत. शिंदे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी बीकेसी मैदान मिळाले. मात्र शिवसेनेच्या परवानगी अर्जावर अजूनही टांगती तलवार आहे. दरम्यान शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे शिष्टमंडळ आज मुंबई पालिकेच्या जी नॉर्थ कार्यालयात जाणार आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याबाबत निर्णय न झाल्यामुळे सेना आता आक्रमक झाली आहे.
दोन्ही गट मूळ शिवसेना असल्याचा दावा करत आहेत. तर शिवसैनिक आजही आपल्या पाठिशी आहेत, असा संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्यातून द्यायचा आहे, मात्र त्याच्या परवानगीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी बीकेसी मैदानासाठी अर्ज दखल केला होता. यानंतर आता आता सूत्रांकडून मोठी माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rahul Gandhi | राहुल गांधींच्या काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवडीला महाराष्ट्रातून विरोध
- Shivsena | दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आक्रमक! घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- Kishori Pednekar | तुमच्या बापाचं नाव तुमच्या आईला विचारायला जायचं का?, किशोरी पेडणेकर कदमांवर संतापल्या
- Weight Loss Tips | डायटिंग न करता वजन कमी करायचय? मग ‘या’ टिप्स करा
- BJP । “पवारांची आणि रामराजेंची बेनामी संपत्ती एकत्र केली तर महाराष्ट्राचे साडेपाच कोटीचे कर्ज संपून जाईल”


