मुंबई : मुंबई- राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 3721 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 1,35,796 वर गेली आहे. तर दिवसभरात 62 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1962रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबई कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.शासनाकडून सर्व उपाय करून देखील कोरोना वाढतच असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोन वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोन्ही वाहनचालकांवर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राज ठाकरे यांचे कृष्णकुंज हे निवासस्थान दादरच्या शिवाजी पार्क परिसरात आहे. दादर, माहीम आणि धारावी हा परिसर पालिकेच्या जी नॉर्थ या वॉर्डात येतो. काही दिवसांपासून या वॉर्डात मोठ्याप्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या शासकीय सुरक्षा रक्षकांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने त्यांनी ‘कोरोना’वर यशस्वी मातही केली. सुरक्षा रक्षकांनी ‘कृष्णकुंज’च्या दारातच कोरोनाला रोखल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर आता वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून काल डिस्चार्ज देण्यात आला. दोन दिवसांपूर्वी त्यांची दुसरी कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. मात्र नियमानुसार पुढील 14 दिवस धनंजय मुंडे यांना होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. धनंजय मुंडे यांना अकरा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
राज ठाकरेंचे भाषण म्हणजे ‘निव्वळ करमणूक’ : शरद पवार
मनसेची ताकद वाढली; या पक्षाने दिला पाठींबा
शेवटी बहिणीची माया : भाऊ काळजी घे, पंकजा मुंडेंनी केला धनंजय मुंडेंना फोन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

