Share

शेवटी बहिणीची माया : भाऊ काळजी घे, पंकजा मुंडेंनी केला धनंजय मुंडेंना फोन

Published On: 

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते.

याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी करोनावर मात केली आहे.

धनंजय मुंडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काल रात्री ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. ते मुंबईत कॅबिनेट बैठकीला गेले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अशी माहिती बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, 10 जून रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते. वर्धापन दिन आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क आल्याने ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे.

भय इथले संपत नाही : राज्यातील रुग्णसंख्या १ लाखावर, दिवसभरात १२७ बाधित दगावले

याबाबत माहिती मिळताच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सर्व मतभेद दूर ठेवून धनजंय मुंडे यांना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. सहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत पंकजा आणि धनंजय या दोन्ही भाऊ-बहिणींमधील मतभेद बघायला मिळाले होते. मात्र, आता धनंजय मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बहिण पंकजा मुंडे यांनी फोन करत तब्येतीची विचारपूस केली. “प्रकृतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा”, असं पंकजा फोनवर धनंजय मुंडे यांना म्हणाल्या

तर, येत्या 10 दिवसांत धनंजय मुंडे पुन्हा सक्रीय होतील अस आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितल असून धनुभाऊंची प्रकृती चांगली असल्याचं देखील त्यांनी सांगितल आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात सर्व नियमांचं पालन झाल आहे, तर मंत्रीमंडळ बैठकीत देखील नियमांचं पालन केले गेल्याची माहिती राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

जयंत पाटलांशी चर्चेनंतरच पुढील दिशा ठरविणार – अजित पवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!