पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपसोबत जाण्याबाबत पक्षाने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. मनसे भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असलेल्या चर्चेला मनसेने तूर्तास विराम दिला आहे. त्यामुळे शहर पदाधिकाऱ्यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य करू नये, असे आदेशच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी राज ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत भाजपसोबत युतीबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज ठाकरे शुक्रवार आणि शनिवारी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मागील तीन महिन्यांत हा त्यांचा सुमारे दहावा दौरा असून, त्यांनी निवडणुकांच्या तोंडावर संघटनात्मक बांधणीला भर दिल्याचे चित्र आहे. या दौऱ्यात ते मनसेचे सर्व शाखाध्यक्ष, शहर सचिव, शहर संघटकांशी शुक्रवारी चर्चा करणार आहेत. त्यानंतर शनिवारी विभाग अध्यक्ष आणि उपशहराध्यक्षांच्या नियुक्त्या करणार आहेत. शनिवारी ते मनसेच्या 19 माजी नगरसेवकांशी चर्चा करणार असल्याचे पक्षाचे नेते बाबू वागसकर यांनी सांगितले.
राज्यात पुढील वर्षी महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेच्या युतीची अटकळ बांधली जात आहे. पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा झाल्याने पुण्यातही ही युती होण्याची चर्चा होती. त्यातच राज्य शासनाने 3 सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे, तर 2017 मध्ये मनसेला 4च्या प्रभाग रचनेत सर्वाधिक फटका बसला होता. यात पक्षाच्या नगरसेवकांची संख्या 28 वरून थेट 2 वर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसमध्ये धुसफूस सुरूच : कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) बैठक ताबडतोब बोलावण्याची गुलाम नबी आझाद यांची मागणी
- रस्त्यांच्या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही- मुख्यमंत्री
- ‘मी कट-कमिशन खाल्ले तर बुडबुड घागरी’, तेच कंत्राटदार, त्याच निविदा ‘सब गोलमाल है’
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- आपल्या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्षच नाही, त्यामुळे निर्णय कोण घेतंय याची कल्पना नाही – सिब्बल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

