मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसेतर्फे संघटनात्मक बळकटीवर भर देण्यात येत आहे. मनसेने 15 वर्षाच्या राजकीय वाटचालीत सदस्य नोंदणी करण्यासाठी पहिल्यांदाच वृत्तपत्रात जाहिरात दिली आहे. आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये मुखपृष्ठावर मनसेच्या सदस्य नोंदणीची आज जाहिरात आहे. अरे बघताय काय सामिल व्हा, असं म्हणत मनसेने तमाम मराठीजनांना साद घातली आहे.
आज सकाळी 10 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी स्वतःची सदस्य नोंदणी केली आहे. मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर सदस्य नोंदणीसाठी वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीचा मजकूर काल रात्री व्हॉटस् अप करण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त सदस्य नोंदणीचे मनसेचे लक्ष्य आहे.
आजपासून ही सदस्य नोंदणी सुरू झाली आहे. सदस्य होण्यासाठी तीन पर्याय देण्यात आले आहेत. मोबाईल वर स्कॅन करून, संकेत स्थळावर जाऊन किंवा जाहिरातीत दिलेल्या मोबाईल नंबरवर मिस्ड कॉल देऊन नागरिकांना मनसेचे सदस्य होता येणार आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोबिंवली तसंच मिरा भाईंदर महापालिका निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. याच महानगरपालिकासांठी खुद्द राज ठाकरे यांनी पुढे सरसावत गेल्या अनेक दिवसांपासून विभागवार मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- लोक तुमची प्रतिमा उद्ध्वस्त करू शकतात पण… , वाझेंच्या अटकेनंतर संजय राऊतांचं ट्विट
- ‘समांतर’ भाग दोन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस…
- पायाच्या दुखापतीनंतर ममता आज पुन्हा निवडणूक रणांगनावर
- गतवर्षीच्या निराशाजनक कामगिरीनंतर धोनीने घेतला संन्यास? भिक्खूच्या अवतारातला फोटो व्हायरल
- चौकशीनंतर सत्य बाहेर येईलच, वाझेंच्या अटकेनंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

