अहमदनगर: येत्या काही दिवसात साखर कारखान्यांचा गळीत हंगामाला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर साखर कारखाना व्यवस्थापनाकडून गळीत हंगामाचे पूर्वनियोजन सध्या सुरू आहे. त्याच बरोबर यावर्षी सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असताना. लॉक डाऊन करण्यात आल्याने सर्वच उद्योग व्यवसायां वर परिणाम दिसून येत आहेत.
मात्र, आता लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर उद्योग-व्यवसाय पुन्हा एकदा हळूहळू सुरू झाले आहेत. सर्वच क्षेत्रांमध्ये आता कोरोना संदर्भात खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. प्रवरानगर येथे कारखाना कार्यस्थळावरील रुग्णालयात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कोरोनानंतर जनावरांमध्ये देखील संसर्गजन्य आजाराचा शिरकाव; पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण…
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गळीत हंगामासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून कोरोणा विषयी खबरदारी घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून डॉक्टर विखे पाटील कारखान्याचे, चेअरमन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या कोरूना चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटतीये, कंगणा राणावतचा आरोप
कोरोना काळात देखील सामाजिक बांधिलकी जपत विखे परिवाराने विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवले. त्याच प्रमाणे कारखाना सुरू झाल्यानंतर कारखाना कर्मचारी आणि कामगार यांच्या आरोग्य विषयी कारखाना व्यवस्थापनाला माहिती असावी जेणेकरून त्या संदर्भात काळजी घेता येईल यासाठी या चाचण्या करण्यात येणार असल्याचे आ. राधाकृष्ण विखे यांनी सांगितलं. या चाचण्या करण्यासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम नेमण्यात आली असून दररोज 250 ते 300 कामगारांच्या चाचण्या केले जाणार आहेत. तसेच त्यानंतर येणाऱ्या रिपोर्टनुसार कामगारांना आरोग्याच्या संदर्भात मार्गदर्शन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करावं हा त्यांचा अधिकार ; संजय राऊतांच विरोधकांना उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

