🕒 1 min read
मुंबई : शुक्रवारी पुण्यामध्ये ‘पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया’ या संघटनेवरील छापेमारीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशा धक्कादायक घोषणा देण्यात आल्या. याप्रकारामुळे सगळीकडे खळबळ उडाली. त्याचप्रमाणे या घोषणाबाजीवरून विरोधी पक्षनेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आहे. अशातच भाजप पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
काय म्हणाले आशिष शेलार ?
पीएफआयचा देशविरोधी कट उघड, पुण्यात तर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा. मर्द असल्याचे वारंवार जाहीर करणाऱ्या, हिंदुत्ववादी असल्याचा कांगावा करणाऱ्या, सतत संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमितभाई शाह यांच्यावर टीका करणारे उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत?, असा खोचक सवाल आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.
इतिहासातील खानांची सदैव “उचकी” लागणारे
भाजपाचा राजकीय कोथळा काढायला निघालेले..
संकटे टळून गेल्यावर करुन दाखवलेचे “होर्डिंग” लावणारे
आता
पीएफआयवरील कारवाईचे समर्थन ही करायला तयार नाहीत… आणि पाकिस्तान झिंदाबादचा निषेध ही करत नाहीत!
आता कुठल्या बिळात बसला आहात?
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 25, 2022
यासंदर्भात आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये असंही म्हटलं आहे की,इतिहासातील खानांची सदैव ‘उचकी’ लागणारे, भाजपाचा राजकीय कोथळा काढायला निघालेले. संकटे टळून गेल्यावर करुन दाखवलेचे ‘होर्डिंग’ लावणारे आता पीएफआयवरील कारवाईचे समर्थन ही करायला तयार नाहीत. आणि पाकिस्तान झिंदाबादचा निषेध ही करत नाहीत.आता कुठल्या बिळात बसला आहात?
दरम्यान, पुण्यातील या घोषणाबाजी विरेधात भाजपच्या अनेक नेत्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितेश राणे यांच्याही समावेश असल्याचं समजतं आहे.
पीएफआयचा देशविरोधी कट उघड,
पुण्यात तर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा..मर्द असल्याचे वारंवार जाहीर करणाऱ्या…हिंदुत्ववादी असल्याचा कांगावा करणाऱ्या…सतत संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमितभाई शाह यांच्यावर टीका करणारे…
उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत?
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 25, 2022
महत्वाच्या बातम्या :
- Gulabrao Patil । दसरा मेळाव्यात गांधी, पवारांचे विचार मांडू नका; गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
- Viral Video | विमानात चढला फेरीवाला, मजेशीर पद्धतीने वस्तू विकण्याचा केला प्रयत्न
- INS | अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा वाढली; मुख्यमंत्री पदाचाही राजीनामा देणार?
- Sandipan Bhumare | “वर्षा बंगला सोडताना उद्धव ठाकरेंनी एखाद्या नवरी सारखं…”, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा संदीपान भुमरेंच्या निशाण्यावर
- Health Tips | आयुर्वेदिक पद्धतीने डोकेदुखीवर उपाय, हिवाळ्यात या टिप्सचा नक्की करा वापर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
