Share

वीज बिल भरलं नाहीत तर वीज तोडण्याचा निर्णय हा तुघलकी, वीज तोडण्याच्या निर्णयावरून मनसे आक्रमक

Published On: 

मुंबई : वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयास आज दिले आहेत. डिसेंबर 2020 अखेर राज्यात एकूण 63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही.

डिसेंबर अखेर राज्यातील कृषिपंप ग्राहकांकडे 45 हजार 498 कोटी रुपयांची थकबाकी आहे तर वाणिज्यिक, घरगुती व औदयोगिक ग्राहकांकडे 8485 कोटी रुपये व उच्चदाब ग्राहकांकडे 2435 कोटी रुपयांची थकबाकी आहे. राज्यात मार्च 2020 मध्ये कोविड 19 मूळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता व राज्याचे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हत्यामध्ये भरण्याची सवलत महावितरणने दिलेली आहे. सोबतच थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. तसेच ग्राहकांच्या वीज बिलासंबंधी तक्रारी असल्यास त्या तात्काळ सोडविण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत.

यावरून आता जोरदार राजकारण तापायला सुरवात झाली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी वीज बिल, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्य सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. महावितरणनं वीज ग्राहकांना वीज बिल भरलं नाहीतर वीज कापण्याचा इशारा देण्यात आला आहे. सरकारकडून एका बाजूला वीज बील माफ करण्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. ऊर्जा मंत्री गोड बातमी देऊ असं सांगतात. 100 यूनिटपर्यंत वीज मोफत देऊ असं सागतात. हे सरकार लोकांच्या भल्यासाठी आलेले नाही. हे लोकांचे दुश्मन आहेत हे जनेतला कळलं पाहिजे, असं नांदगावकर म्हणाले आहेत.

वीज बिल भरलं नाहीत तर वीज तोडण्याचा निर्णय हा तुघलकी स्वरुपाचा आहे. या सरकाला लोकांना निश्चितपणे अंधारात ढकलायचं आहे. हे सरकार लोकांच्या भल्यासाठी आल्याचं दाखवतं आहे मात्र ते तीन पक्षांच्या भल्यासाठी आलेले आहे. जनतेने सरकारला गाढून टाकावं, आवाहन बाळा नांदगावकर यांनी केले. मनसे वीज बीलप्रश्नी रस्त्यावर उतरली, आंदोलन केले, निवेदन दिले हात जोडले, मनसेने वीज बिल प्रश्नी काय आणखी काय करायला पाहिजे, असा सवाल नांदगावकरांनी केला. हे सरकार लोकांना अंधारात ढकलणार असेल तर लोकांनीही राज्य सरकारला अंधारात ढकलायला तयार राहिलं पाहिजे, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!