🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात भोंग्याच्या मुद्यावरुन राजकारण तापले असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या निर्देशांनुसार उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यंत जवळपास ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. दरम्यान, योगी सरकारच्या या कारवाईवर आता मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात अविनाश जाधव यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,‘उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक स्थळांवरील एकूण ६०३१ भोंगे उतरवताना एकाही ठिकाणी कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली नाही. मग महाराष्ट्रात कुठून कायदा सुव्यवस्था बिघडण्याच वावटळ उठवल जातय?’ तसेच सरकारची इच्छाशक्ती नाही? की सरकारला मुद्दामून हे घडवायच आहे?, असा सवालही त्यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक स्थळांवरील एकूण ६०३१ भोंगे उतरवताना एकाही ठिकाणी कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली नाही.
मग महाराष्ट्रात कुठून क़ायदा सुव्यवस्था बिघडण्याच वावटळ उठवल जातय? सरकारची इच्छाशक्ती नाही का सरकारला मुद्दामून हे घडवायच आहे?@CMOMaharashtra
— avinash jadhav (@avinash_mns) April 28, 2022
दरम्यान, काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी भोंग्यांसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यावेळी प्रत्येक धर्माला त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी माईक, स्पीकर यांचा वापरही करण्यास हरकत नाही. मात्र कुणाचाही अडथळा करुन जी गोष्टी केली जाते, त्याला प्रार्थना म्हणता येऊ शकत नाही, असे योगी म्हणाले होते. तसेच नव्याने माईक लावण्यासाठी परवानगी देऊ नये, असे आदेशही उत्तर प्रदेश सरकारकडून जारी करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या:
- आशिष शेलार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची टीका; म्हणाले, “ते मोठे नेते आहेत, त्यांच्याशी…”
- “…कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से”, ‘त्या’ निर्णयावरून अमृता फडणवीसांचा सल्ला
- IPL 2022 GT vs SRH : मुरलीधरनचं असं रुप पाहिलंय का? ‘या’ गोष्टीमुळं रागानं लालबुंद झाला आणि…! पाहा VIDEO
- “MNS ला राष्ट्रवादीची फूस असती तर राज ठाकरेंनी शरद पवारांना…”, अजित पवारांचे मोठे विधान
- IPL 2022 DC vs KKR : ऋषभ पंत विरुद्ध श्रेयस अय्यर; वाचा कोण आहे कोणावर भारी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
