Share

“MNS ला राष्ट्रवादीची फूस असती तर राज ठाकरेंनी शरद पवारांना…”, अजित पवारांचे मोठे विधान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मनसेला राष्ट्रवादी काँग्रेस फूस देत असल्याच्या आरोपांबाबत उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती तर राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीयवादी असल्याची टीका केली असती का? असा सवाल अजित पवार (ajit pawar) यांनी केला.

“मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती तर राज ठाकरेंनी शरद पवारांना जातीयवादी म्हटले असते का? राज ठाकरे आज भाषणे करत असताना ते भाजपवर टीका करत नाहीत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरच टीका करतात. मात्र लोकसभेला त्यांचा अजेंडा वेगळा होता. त्यावेळी त्यांनी फक्त भाजपला टार्गेट केले होते. ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. २०१९ ला आघाडीला अप्रत्यक्ष फायदा होईल, अशा पद्धतीने त्यांनी सभा घेतल्या होत्या.”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान यावेळी अजित पवार यांनी नवनीत राणा या २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांचे पती रवी राणा हे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होते. २०१९ ला पुन्हा रवी राणा आणि नवनीत राणा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार असल्याचे म्हटले. आपण ज्यांना पुरस्कृत करतो, ते आपल्यासोबतच राहतील का? हे तपासण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आण शिवसेनेचे एकत्र सरकार येईल असे कुणालाच वाटले नव्हते. एके काळी ममता बॅनर्जी आणि भाजप एकत्र होते, आज ममतादीदी भाजपच्या विरोधक आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार कधी भाजप सोबत असतात कधी भाजपचे विरोधक होतात. त्यामुळे अशा घटना आपल्या इथेच नाही, तर भारतभर घडत असतात. असे अजित पवार यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!