🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये बुधवारी रात्री माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनचे असे रूप पाहायला मिळाले, जे याआधी क्वचितच कोणी पाहिले असेल. सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाजी प्रशिक्षक मुरलीधरन गुजरात टायटन्सविरुद्धच्या (GT vs SRH) सामन्यात रागात दिसला. या सामन्याच्या शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी २२ धावांची गरज होती. सनरायझर्सकडून मार्को जानसेन गोलंदाजी करत होता. तेवातियाने पहिल्या चेंडूवर षटकार तर राशिद खानने तिसऱ्या, पाचव्या आणि शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत सामना जिंकवून दिला.
या षटकात मुरलीधरनला जानसेनच्या गोलंदाजीवर इतका राग आला, की तो डगआऊटमध्ये उभा राहिला आणि ओरडू लागला. मार्को जानसेनने राशिद खानला पाचवा चेंडू फुल टॉस टाकला. ज्यावर राशिदने आरामात षटकार ठोकला. यावर मुरलीधरन नाराज झाला. मुरलीधरन पुन्हा खुर्चीवर बसला, मात्र आता त्याच्या रागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/SayedReng/status/1519376388830425088
असा रंगला सामना…
वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटप्रेमींना जबरदस्त सामना पाहायला मिळाला. सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये गुजरात टायटन्सकडून (GT vs SRH) ५ गड्यांनी पराभव पत्करला. या सामन्यात गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा, एडन मार्कराम यांची अर्धशतके आणि शशांक सिंहच्या स्फोटक खेळीच्या जोरावर हैदराबादने गुजरातसमोर १९५ धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात गुजरातचे पहिले पाच फलंदाज हैदराबादच्या एकट्या उमरान मलिकसमोर ढेपाळले. त्यानंतर राहुल तेवतिया आणि राशिद खान यांनी स्फोटक खेळी करत हैदराबादच्या आव्हानाचा शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून पाठलाग केला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
