Share

ऑस्करसाठी निवड झालेल्या ‘जल्लीकट्टू’ चित्रपटावरून, पुन्हा कंगणाने सुनावले बॉलीवूड माफियांना

Published On: 

मुंबई : यावर्षी ऑस्कर आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी भारतातून मल्याळी भाषेतील ‘जल्लीकट्टू’ या चित्रपटाची निवड केली गेली आहे. या चित्रपटाने ऑस्कर निवडीपूर्वी भारतीय आणि विदेशी चित्रपट महोत्सवात अनेक पारितोषिके मिळविली आहेत. या चित्रपटाचा प्रीमियर ६ सप्टेंबर २०१९ रोजी टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये झाला होता आणि या चित्रपटाला प्रचंड पसंती मिळाली होती.

त्यानंतर ४ ऑक्टोबर २०१९ मध्ये केरळ राज्यात तो रिलीज झाला. बुसान इंटरनॅशनल फेस्टिव्हल मध्ये तसेच ५० व्या फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया मध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक लीझो जोस पेल्लीसारी याना बेस्ट दिग्दर्शक म्हणून गौरविले गेले होते. त्यावेळी या चित्रपटाने अनेक अन्य पारितोषिके मिळविली होती.

यावरच ट्विटरवर आपले बेधडक मत मांडणारी अभिनेत्री कंगनाने पुन्हा एकदा बॉलिवूड स्टार्सना निशाण्यावर धरलं आहे. ऑस्कर नामांकनाच्या निमित्ताने. बुधावारी तिने ‘जल्लीकट्टू’ हा सिनेमा ऑस्करच्या रेसमध्ये गेल्याने सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा मुव्ही माफियावर निशाणा साधला.

कंगना रणौतने ट्विट केलं की, बॉलिवूड विरोधात जेवढा आवाज उठवला जात होता, जेवढी चौकशी केली जात होती अखेर त्यातून काहीतरी फायदा झाला. भारतीय सिनेमे केवळ फिल्मी परिवारांसाठी नाहीयेत. मुव्ही माफिया आता आपल्या घरातच लपले आहेत आणि ज्युरीजना आपलं काम करू देत आहेत. टीम ‘जल्लीकट्टू’ ला शुभेच्छा’.

बुधवारी दिग्दर्शक लिजो जोस पेल्लिसेरीचा सिनेमा ‘जल्लीकट्टू’ ला ९३व्या अकॅडमी अवॉर्ड्ससाठी भारताकडून ऑफिशिअल एन्ट्री मिळाली आहे. या सिनेमाला बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म विभागात नामांकन मिळालं आहे. या सिनेमात एंथनी वर्गीज, चेंबन विनोद जोस, सॅंथी बालाचंद्रनसारख्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!